Duration 3:36

वजडी चा रस्सा | wajadi cha rassa

5 524 watched
0
86
Published 5 Aug 2021

नॉन वेज खाणाऱ्या मध्ये हि मटण खाणाऱ्या ची एक वेगळीच श्रेणी असते आजची रेसिपी खास मटणाच्या खवैयांसाठी. अतिशय जिकरीने बनवला जाणारा मटणाचा एक वेगळा प्रकार म्हणजे वजडी आज बनवूया वजडी चा रस्सा . वजडी चा रस्साबनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो वजडी ,२ कांदे , ४ ते ५ हिरच्या मिरच्या, ५ ते ६ सुक्या लाल मिरच्या, आल्याचा मोठा तुकडा लसणाच्या ७ ते पाकळ्या , सुक्या नारळाचा एक लहान तुकडा , उपलब्ध असलेला सर्व साबूत गरम मसाला, अर्ध लिंबु ड, हळद चवी पुरतं मीठ आणि वाट्या तेल. सर्व प्रथम वजडी स्वच धुऊन घ्या मग एका मोठ्या पातेल्यात हळदीचे पाणी उकळत ठेवा उकळत्या पाण्यात सुटलेली वजडी घालून १० मिनिट उकळू द्या १० मिनिटांनी उकळवून घेतलेली वजडी वाहत्या पाण्याखाली धरून पुन्हा एकदा स्वच्छ धुऊन घ्या. खरतर वबरेच मटण शौकीन फक्त वजडीला साफ करण्याच्या त्रासाला कंटाळून वजडी खाणं टाळतात. आता स्वच धुतलेल्या वजडी ला मीठ व हळद लावून घ्या व लिंबाचा रस पिळा . या नंतर एक कांदा, हिरवी मिरची, आलं, अक्खा गरम मसाला सुक खोबरं सुक्या लाल मिरच्या लोखंडी तव्यात खरपूस भाजून घ्या व सर्व एकत्र करून याच वाटण तयार करा. याच वाटणात मग लसणाच्या पाकळ्या घालायला विसरू नका. या नंतर कुकर मध्ये २ पळ्या तेल तापवायला ठेवा तापलेल्या तेलात जाडसर चिरलेला एक कांदा घाला. आणि मीठ व हळद लावलेली वजडी घालून चांगली परतून घ्या. मध्यम आचे वर वजडी चांगली परतून घ्या वजडीचा उग्र दर्प जाई पर्यंत भाजत राहा साधारण १० मिनिट परतल्यानंतर यात मसाला घाला आणि पाणी वाढवा यानंतर कुकर चा झाकण बंद करून ५ शिट्ट्या करा . तयार झाली झणझणीत अशी वजडी असा वजडी चा रस्सा तुम्ही नक्की बनवा आणि कसं झाला ते आम्हाला कळवा. Subscribe to Being Marathi Recipes:- http://bit.ly/SubscribeBeingMarathiRecipe https://www.facebook.com/beingmarathi?ref=hl https://www.instagram.com/being_marathi_recipes/ https://twitter.com/beeingfilmy https://plus.google.com/b/102604561801583424476/102604561801583424476/posts https://www.linkedin.com/home?trk=nav_responsive_tab_home http://www.pinterest.com/aaryainternatio/pins/ https://www.tumblr.com/blog/beeingfilmy

Category

Show more

Comments - 8