Duration 10:40

Reis Magos Fort Goa | रेईस मागोस किल्ला गोवा

334 watched
0
12
Published 18 Mar 2021

Reis magos fort गोव्याचे राजधानीचे शहर पणजीपासून फक्त ८ किमी अंतरावर आहे. पणजीवरून मांडवी नदीवरचा पुल ओलांडून मुंबई हायवेला लागले कि उजवीकडे नवीन विधानसभेची इमारत दिसते, तर डावीकडे एक रस्ता पुलावरुन खाली उतरुन बेतीम बीचकडे जाणारा रस्ता पकडावा. डाव्या हाताला मांडवी नदीचे पात्र आणि त्यात बोटींची वर्दळ पहात, बघता बघता आपण बेतीम बीच मागे टाकून रेइस मागोच्या पुढ्यात येतो. पूर्वी उत्तरेकडून किल्ल्याच्या शिखर माथ्यावर जाण्यासाठी उंच पायऱ्या बांधल्या होत्या पण आता तेथे रस्ता केला आहे. प्रत्येकी ५० रुपयांचे तिकीट काढून किल्ल्यात प्रवेश घ्यावा असला तरी एकुण राखलेला हा किल्ला बघताना ते सार्थकी लागतात. प्रत्येक सोमवारी हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो तर इतर दिवशी किल्ला पाहण्याची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ अशी मर्यादित आहे. एखादा किल्ला कसा ठेवावा किंवा एखादा किल्ला कसा जतन करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोव्यातील हा रेइश मागुश किल्ला. गोवा सरकारने याची पुनर्बांधणी करून इतिहासाचं फाटलेले सुवर्णपान पुन्हा पुस्तकात चिकटवलं आहे. माहिती source @Durgvedhh #Trekkers_Journey @trekkersjourney fb photo album : https://m.facebook.com/story.php?story_fbid=10215409222942215&id=1786395204 Instagram

Category

Show more

Comments - 5